scorecardresearch

“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

Bhaskar Jadhav On Ramadas Kadam : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. त्यावरून भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…
भास्कर जाधव आणि रामदास कदम (संग्रहित फोटो)

वेदान्त समूहाच्या भागीदारीतून उभा राहणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला होणार आहे. तेव्हापासून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यावरून आता भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

“महाराष्ट्रात २०१४ साली भाजपाचं सरकार आलं. तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले आहेत. गुजरातचा विकास होण्यासाठी कोणाचा विरोध नाही. मात्र, केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे, माहिती नाही. कारण महाराष्ट्रात येणारे प्रकल्प हे गुजरातला जात आहेत,” असा निशाणा भास्कर जाधव यांनी भाजपावर साधला आहे.

आदित्य ठाकरे लोकांना वेदान्तबाबत खोट सांगत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. “रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाहीतर पॉपकॉर्न बोलतात. रामदास कदम यांची बुद्धिमत्ता काही दिवसांपूर्वी सांगितली आहे. लोक रामदास कदमांना जोकर म्हणून पाहतात, यापेक्षा आम्ही त्यांना फार महत्व देत नाही,” असे प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी कदम यांना दिलं आहे.

दसरा मेळाव्यात सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडणार का?, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. “तुमच्या बँनरवर भाजपाच्या लोकांची फोटो होते, आमच्या तर नाहीत ना. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना दसरा मेळाव्यात उत्तर देऊ,” असे भास्कर जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या