जळगाव/अलिबाग : दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर महायुतीतील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली, तर शिवसेना आणि भाजप आमदारांच्या विरोधानंतरही कन्या आदिती यांच्यासाठी रायगडचे पालकमंत्रीपद मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी ठरले आहेत.

मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

posters praising eknath shinde as man of god displayed in front of pimpri chinchwad municipal corporation
“एकनाथ शिंदे देव माणूस”, पिंपरीत झळकले फ्लेक्स; त्यांच्या योजना बंद करू नका अशी विनंती करण्यात आली
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार

हेही वाचा : Imtiaz Jaleel : “अजित पवार फक्त कागदावर बीडचे पालकमंत्री असतील, अन् दुसरंच कोणी…”, इम्तियाज जलील यांचा आरोप

२०२२ मध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद कारणीभूत ठरले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता. त्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना आमदारांनी मिळू दिले नव्हते. दोन वर्षे रत्नागिरीच्याच उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. आता मात्र शिवसेना आमदांरांचा विरोध डावलून आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिले गेल्याने, महायुतीमधील असंतोष नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे.

आपली नाराजी नाही. मिळालेली जबाबदारी पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संवाद साधून पालकमंत्रीपदाविषयी निर्णय घेतले आहेत. ते निर्णय पुढे नेणे हे कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे. – दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री

हेही वाचा : Aaditi Tatkare : “पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिली असली तरी…”, आदिती तटकरेंचं भरत गोगावलेंच्या नाराजीबाबत मोठं विधान

भुसेंनाही संधी नाही

गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले.

दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळणे आवश्यक होते. तशी आमची प्रामाणिक इच्छा होती. -गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री

Story img Loader