केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून विरोधकांना रोखण्यासाठी वापर केला जात असल्याची टीका शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांकडून वारंवा केली जात आहे. अजूनही राज्यातील सत्ताधारी पक्षांशी संबंधित अनेक नेत्यांवर आणि माजी मंत्र्यांवर ईडी, सीबीआय किंवा प्राप्तीकर विभागाच्याय कारवाया सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ या सदरामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यावर टीका करतानाच खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. तसेच, किरीट सोमय्यांवर देखील त्यांनी तोंडसुख घेतलं आहे.

देशमुखांवरील आरोपाचा आकडा २ कोटींच्या खाली!

१०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप झालेल्या देशमुखांवरील व्यवहाराचा आकडा आता २ कोटींच्याही खाली गेल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “विरोधी पक्षाला लगाम राहावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा हंटर केंद्रानं आपल्या हाती कसा ठेवला आहे, त्याची प्रकरणं रोजच समोर येत आहेत. पोलीस बदल्यांत भ्रष्टाचार झाला म्हणजे नक्की काय झाले व त्याचे पुरावे काय? या बदल्यांत १०० कोटींचा व्यवहार झाला, तो पुढे पाच कोटी आणि आता देशमुखांवरील आरोपपत्रात तो आकडा दोन कोटींच्या खाली घसरला. त्यासाठी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आत्तापर्यंत १२०च्या आसपास धाडी घातल्या”, असं राऊत म्हणाले आहेत.

sanjay raut devendra fadnavis (9)
“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!”

मोदी-शाहांचा थेट हस्तक्षेप नाही?

दरम्यान, या सदरामध्ये संजय राऊतांनी या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा थेट हस्तक्षेप असेल, असं दिसत नसल्याचं म्हटलं आहे. “माझ्यावर ईडीनं कारवाई केली. त्याला कोणताही आधार नाही. पण महाराष्ट्रात, बंगालमध्ये सिलेक्टेड टार्गेट्स या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. यामध्ये मोदी आणि शाह यांचा थेट हस्तक्षेप असेल असं दिसत नाही. पण महाराष्ट्रातील भाजपाचे एक प्रमुख नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे एक-दोन बडे अधिकारी महाराष्ट्रात हा खेळ खेळत आहेत”, असा दावा राऊतांनी केला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेचा तपशील!

संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याशी झालेल्या कथित चर्चेचा देखील तपशील दिला आहे. “मी त्यांना विचारलं, नक्की काय सुरू आहे. त्यावर ते एका शब्दात म्हणाले, आम्ही टार्गेटवर काम करतोय. याचा अर्थ यंत्रणांचे राजकीय बॉस जे टार्गेट देतील, त्यानुसार कारवाया होत आहेत. मी म्हटलं उद्या सरकार बदललं तर काय कराल? तर ते म्हणाले नवं सरकार सांगेल तसं काम करू. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुंबई-महाराष्ट्रात पैसा आहे. त्यामुळे इथे प्रत्येक केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला काम करायचं आहे”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

“व्यवस्थेविरुद्ध बोलणारे मात्र अपराधी ठरले”

“राकेश वाधवानशी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्राचे सरळ जमिनीचे व्यवहार झाले. त्यावर ईडीसारख्या यंत्रणा कारवाईचा कागद हलवायला तयार नाहीत. ओमर अब्दुल्लांपासून मेधा पाटकरांपर्यंत सध्याच्या व्यवस्थेविरुद्ध बोलणारे मात्र अपराधी ठरले. दुर्बल विरोधी पक्षावर केंद्रीय तपास यंत्रणांचा हातोडा रोज बसत आहे आणि आपले गृहमंत्री शहा म्हणतात, त्यांना विरोधी पक्ष सक्षम झालेला पाहायचा आहे! हा विनोद मनोरंजक आहे”, असा टोला देखील राऊतांनी लेखातून लगावला आहे.