योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात,असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याच प्रकारावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला. त्या बीड येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात, हे विधान अतिशय गंभीर असून यावर एकानेही आक्षेप घेतला नाही. रामदेव बाबांवर गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे. खरं तर, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. कारण भारतीय संविधानातील कलम ३५४ नुसार, विनयभंगाची संज्ञा अशी सांगते की, जिथे एखादं उच्चारण, वाक्य, कृती, उक्ती किंवा घटनेमुळे महिलांना लज्जा किंवा संकोच उत्पन्न करते, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो.”

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

“आता रामदेव बाबांनी म्हटलं की, महिलांनी कपडे घातले नाही, तरीही ती चांगली दिसते. हे विधान आम्हाला (महिलांना) संकोच निर्माण करणारं आहे. आमच्या स्त्री सुलभतेला लज्जा उत्पन्न करणारं आहे. रामदेव बाबांशेजारी मंचावर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. पण त्यानंतर जावेद नावाच्या कोणत्या तरी व्यक्तीवर एवढी चर्चा का होते?” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should file molestation case against ramdev baba sushama andhare statement amruta fadnavis rmm
First published on: 17-01-2023 at 19:59 IST