श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो. अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. अशी माहिती समोर आली आहे. एवढच नाहीतर श्रद्धाने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असेही नमूद केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा हा तक्रार अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तक्रार असुनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान!

आशिष शेलार म्हणाले, ‘श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.’ असं शेलार यांनी ट्वाटद्वारे म्हटलं आहे.

हेही वाचा – “…यावरून ‘मला तळमळतंय्, मला जळजळतंय्’, अशी तुमची अवस्था होणे साहजिक” ; भाजपाचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

याशिवाय, “त्या नराधम आफताबने श्रद्धा वालकचे ३५ तुकडे केले आणि पुरावे पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातली एक भगिनी तिचा खून त्या आफताबने केला, क्रूर पद्धतीने केला. त्या सगळ्याची चौकशी सुरू असताना आता माध्यमांसमोर एक पत्र येतय आणि ते पत्र असं सांगतय की, २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका आहे, तिला ब्लॅकमेल केलं जातय. तिचे तुकडे तुकडे करून तिचा खून करण्यााच प्रयत्न हा नराधम आफताब करणार आहे. याची माहिती महाराष्ट्रातल्या पोलिसांनी तिने दिली. पोहच प्रत सुद्धा महाराष्ट्राला दिसते आहे. मग महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार आणि पोलीस या सगळ्यावर थंड का?” असा प्रश्नही शेलारांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिद्वारे विचारला आहे.

…तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन काँग्रेस, राष्ट्रवादीचं होतं म्हणून? –

याचबरोबर “जर आमच्या एका मराठी भगिनीने तक्रार करून तिचा खून होणार असल्याची आणि तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यानंतरही महाराष्ट्र पोलीस या पत्रावर का कारवाई करत नव्हते, श्रद्धाचं नाव वालकर होतं म्हणून?, का तो आफताब होता म्हणून?, सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन काँग्रेस, राष्ट्रवादीचं होतं म्हणून?, की या सगळ्यावर पांघरूण घालायचं होतं म्हणून? या सगळ्याची सुद्धा चौकशी होणं, ही काळाजी गरज आहे.” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “…तेव्हा सुद्धा भाजपाच्या आमदार, खासदारांची तोंडं बंद होती” ; बोम्मईंच्या वक्तव्यानंतर अरविंद सावंतांची टीका

…या सगळ्याची चौकशी व्हावी –

“श्रद्धा आज सुद्धा आमच्या जगली असती. जर तत्कालीन पोलीस आणि सरकार यांनी यावर कडक कारवाई केली असती तर. माझी पोलिसांना विनंती आहे. पोलिसांच्या माध्यमातून हे पत्र दाबण्यात आलं का?, याची चौकशी दडवण्यात आली का? या पत्रावर कारवाई होऊ नये म्हणून कोणाचं दडपण होतं का? सरकारमध्ये लागेबांधे असलेले पक्ष त्यांचा यामध्ये काही सहभाग होता का? या सगळ्याची चौकशी व्हावी.” अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case so why are the then government of maharashtra and the police silent on all this ashish shelarmsr
First published on: 23-11-2022 at 17:34 IST