संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारे नेते आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणेंनी आज नागपूरच्या विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला. यावेळी अणेंसह अन्य नेतेही उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या विदर्भवादी नेत्यांनी विविध कार्यक्रम आखले आहेत. कस्तुरचंद पार्क मैदानावर आकाशात काळे फुगे सोडण्यात आले. त्यावर ‘जय विदर्भ’ असे लिहीले होते.
दरम्यान, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शहरात एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. एका तरुणाने एसटी डेपोमध्ये पाच एसटी बसेसची तोडफोड केली. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. युवराज साळवी असे या तरुणाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2016 रोजी प्रकाशित
अणेंनी फडकावला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा
अणेंनी आज नागपूरच्या विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 01-05-2016 at 11:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreehari aney hoisted separate vidharbh flag