अहिल्यानगर: विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी करून, बोगस मतदानाद्वारे भाजपने सत्ता स्थापन केली. या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या साथीने झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी करत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग अजून गप्प कसा, असाही प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूरमध्ये आज, गुरुवारी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ तसेच मतचोरीच्या विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. त्या वेळी आमदार ओगले बोलत होते. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक करण ससाणे म्हणाले, की निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून, एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून, तसेच ह्यात मतदारांची नावे मृतांच्या यादीत समाविष्ट करून निवडणुका जिंकल्या. याचा आम्ही निषेध करतो. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले, की निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपच्या दावणीला बांधला गेला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेले संविधान पायदळी तुडवत निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर हुकूमशहा पद्धतीने ताबा मिळवू पाहत आहेत. माजी सभापती वंदना मुरकुटे, युवकच्या राष्ट्रीय सचिव दीपाली ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले आदींचे भाषण झाले.

आंदोलनात ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रमोद भोसले, अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक दिलीप नागरे, अशोक बागुल, रितेश रोटे, महांता यादव, संगीता मंडलिक, मुन्ना पठाण, के. सी. शेळके, कलीम कुरेशी, नजीर मुलानी, बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण, राणी देसरडा, अशोकराव बागुल, शंकरराव फरगडे, प्रवीण नवले, रितेश एडके, डॉ. राजेंद्र लोंढे, सरवर अली, जावेद शेख, मिथून शेळके, अशोक जगधने, सुरेश दुबे, सुनील साबळे, रियाज खान पठाण, वैभव पंडित, प्रताप कवडे, अतुल खरात, अमोल आवटे, भैया अत्तार, रितेश चव्हाणके, सरबजीतसिंग चुग, शाहरुख शेख, अमोल नाईक, सनी मंडलिक, वैभव कुऱ्हे, जाफर शहा, रजाक पठाण, प्रशांत राऊत, अतिश देसरडा, गणेश काते, कुणाल पाटील, शुभम पाटील, युनूस पटेल, बाबा वायदंडे, शहानवाज बागवान, विशाल साळवे, राजेंद्र भोसले, राजेश जोंधळे, बबलू पठाण, संजय गोसावी, जियान पठाण, तीर्थराज नवले, आकाश जावळे सहभागी होते.