अभिमन्यू लोंढे

महाराष्ट्राचे सख्खे शेजारी गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर असलेला कोकणातील सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून सुमारे ३५ वर्षांपूर्वी, युती सरकारच्या काळात घोषित करण्यात आला. पण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गात वाव असूनही दुर्लक्षामुळे येथे पर्यटनाचा अपेक्षित विकास झालेला नाही.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळात १९८१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन हा जिल्हा निर्माण झाला. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५२०७ चौरस किलोमीटर असून, २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ६५१ आहे. त्यापैकी ४ लाख १७ हजार ३३२पुरुष, तर ४ लाख ३२ हजार ३१९ स्त्रिया आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण आणि देवगड हे तीन तालुके समुद्र किनाऱ्यालगत, तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी हे पाच तालुके सह्याद्री पट्टय़ात आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य, औषधी वनस्पती, बॅक वॉटर, आंबोली थंड हवेचे ठिकाण, रेडी, शिरोडा, वेंगुर्ले, उभादांडा, वेळागर, भोगवे, मालवण, तारकर्ली, देवबाग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला इत्यादी अनेक ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर म्हणून आंबोली थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पावसाळय़ात धबधब्यांच्या सान्निध्यात मौजमजा करण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात हजेरी लावतात. पण, या पर्यटनाचा लाभ स्थानिक बाजारपेठेला मिळणे आवश्यक आहे. म्हणून आंबोली, गेळे आणि चौकुळ या घाटमाथ्यावरील पर्यटन स्थळांचा विकास गरजेचा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे आयुर्वेदीक महाविद्यालय, तर सिंधुदुर्ग नगरी येथे शासकीय आणि दुसरे खासगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. वैद्यकीय महाविद्यालयामुळे येत्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना जिल्ह्यातच सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या तरी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबईवर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय साधनांचा अभाव असल्याने रुग्णांना सेवेसाठी विशेषत: गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय गाठावे लागते. जिल्ह्यात ११ आरोग्य रुग्णालये, तर २१ दवाखाने आणि ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.जिल्ह्यात एकूण २७० शैक्षणिक संस्था असून, ४० महाविद्यालयांद्वारे विविध विद्याशाखांचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त २ अभियांत्रिकी महाविद्यालयेही आहेत.

जिल्ह्यात रेडी, वेंगुर्ले, मालवण आणि विजयदुर्ग ही ४ प्रमुख बंदरे आहेत. यापैकी रेडी बंदर पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून विकसित करण्यासाठी आठ-दहा वर्षांपूर्वी खासगी विकासकाला देण्यात आले. मात्र, ते विकसित झाले नाही. उलट खनिज वाहतुकीमुळे शासनाचे नुकसान व विकासकाची चांदी झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी, सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, तर दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे लोहखनिज प्रकल्प आणि वैभववाडी तालुक्यातील कासार्डे व आचिर्णे येथे सिलिका खाणी आहेत. या खाणींनी येथील निसर्ग आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे.
जिल्ह्यात ६ नद्या आणि ४ लघु पाटबंधारे प्रकल्प असून, जिल्ह्यातील सर्वात मोठा पाटबंधारे प्रकल्प तिलारी नदीवर महाराष्ट्र व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्य जलविद्युत प्रकल्प साकारला आहे. येथून गोवा राज्यात पाणी पुरवठा केला जातो, तर सावंतवाडी तालुक्यातील कालव्याची कामे सुरू आहेत.

रोजगारासाठी स्थलांतराची परंपरा कायम

जिल्ह्यात शेतीखालील एकूण क्षेत्र ५५ हजार ९६६ हेक्टर असून आंबा-काजूच्या बागाही आहेत. या फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग छोटय़ा स्वरूपात आहेत. तसेच कुडाळ आणि माजगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्यमनगरमध्ये मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग नाहीत. त्यामुळे उर्वरित कोकणाप्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि बेळगाव येथे नोकरीनिमित्त जाण्याची पिढीजात परंपरा कायम आहे. याचबरोबर, शेजारच्या गोवा राज्यातही हॉटेल व्यवसाय, उद्योगात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. पण, सिंधुदुर्ग जिल्हा त्याबाबत पिछाडीवर आहे.

वाहतुकीचे मुबलक पर्याय

मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे या दळणवळणाच्या दोन प्रमुख पर्यायांबरोबरच गेल्या वर्षी सुरू झालेल्या चिपी विमानतळामुळे तिसराही पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमेवर गोवा मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाला आहे.

मुख्य प्रायोजक: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पॉवर्ड बाय: सिडको ’यूपीएल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.)
नॉलेज पार्टनर गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे