यवतमाळ : दिग्रस येथून मार्च २०२१ पासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचे नातेवाईकांनीच अपहरण करून खून केल्याचा उलगडा तब्बल एक वर्षांनंतर झाला. पुतणसुनेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नातेवाईकांनीच मिळून खून केल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला. याप्रकरणी नातेवाईकांसह अन्य दोन अशा सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

दिग्रस तालुक्यातील वसंतनगर येथून श्रावण ऊर्फ विठ्ठल परसराम शास्त्रकार (५१) हा ९ मार्च २०२१ रोजी बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याचा भाऊ मुरलीधर शास्त्रकार याने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र वर्षभरापासून प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात होता. दरम्यान, मुरलीधर शास्त्रकार याने पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेऊन आपल्या भावाचा नातेवाईकांनीच घातपात केल्याची लेखी तक्रार दिली. यावरून पोलीस अधीक्षकांनी दारव्हा येथील सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. पोलिसांनी याप्रकरणी श्रावण बेपत्ता असल्याच्या दिवसापासून सर्व माहिती संकलित करून वसंतनगर दिग्रस, नागपूर, पुणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतले. तेव्हा नागपूर येथून ताब्यात घेतलेला आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याने खुनाची कबुली दिली. श्रावण ऊर्फ विठ्ठल शास्त्रकार याचे पुतणसुनेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आणि या अनैतिक संबंधांमुळे काका गोपाल याचा मृत्यू झाला, या संशयावरून नितीन शास्त्रकार याने आपल्या वाढदिवशी ९ मार्च २०२१ रोजी मित्र देवा वाघमारे रा. काळी दौलतखान याच्या मदतीने श्रावण शास्त्रकार याला मोटारसायलने काळी दौलतखान परिसरात निर्जनस्थळी नेले. तेथे देवा वाघमारे, आकाश जाधव, प्रमोद राठोड यांच्या मदतीने दगडाने ठेचून श्रावणचा खून करून मृतदेह एका शेतात जमिनीत पुरला. ही जागाही आरोपीने पोलिसांना दाखवली. पोलिसांनी येथे उत्खनन करून मानवी हाडे, कपडे, ताबीज आदी साहित्य जप्त केले. कपडे व साहित्यावरून हा मृतदेह श्रावण ऊर्फ विठ्ठल शास्त्रकार याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या खुनप्रकरणी नितीन शास्त्रकार, ज्योती लक्ष्मण शास्त्रकार, लक्ष्मण परसराम शास्त्रकार, चेतन लक्ष्मण शास्त्रकार, देवानंद ऊर्फ देवा वाघमारे, प्रमोद दारासिंग राठोड यांना अटक केली. या प्रकरणात एकाच कुटुंबातील चार जणांना अटक झाली आहे. तपास पथकाला पोलीस अधीक्षकांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक