परभणी – मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारात एका शेतातील उघड्या बोअरमध्ये पडलेल्या सोहम सुरेश उक्कलकर या चार वर्षीय चिमूकल्यास बचाव पथकांनी बुधवारी सहा तास प्रयत्न करीत सुखरुपपणे बाहेर काढले. सोहम बाहेर आल्यानंतर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सोहम खेळता-खेळात शेतातील उघड्या बोरमध्ये पडला होता. कुटूंबियांना तात्काळ तो प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनाला कळवण्यात आले.

पाठोपाठ उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ, तसीलदार पल्लीव टेमकर, पोलिस निरीक्षक दिपक दंतूलवार, मुख्याधिकारी कोमल सावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार झाडगावकर आदी अधिकाऱ्यांसह पोलीस व महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रयत्नांची शर्थ केली. नांदेड येथून एनडीआरएफचे बचाव पथक सायंकाळी  दाखल झाले होते. पथकाने  महसूल, पोलिस व अग्निशामक दल व आरोग्य विभागाच्या सहाय्याने जोरदार मोहिम हाती घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेषतः  बोअरच्या बाजूने खोदकाम सुरु केले. तत्पूर्वी सोहमसाठी ऑक्सीजनसुध्दा पुरविण्यात आला. या बचाव पथकाने बोअरमध्ये दोरीच्या सहाय्याने त्या चिमूकल्याच्या हातांना फासे टाकले. त्या दोरीद्वारे हळूवारपणे चिमूकल्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.  हे सारे प्रयत्न यशस्वी ठरले. तब्बल सहा तासानंतर सोहम सुखरूपपणे बाहेर पडला.