पंढरपूर : सोलापुरात पूर्वा नक्षत्रावर पाच तासात विक्रमी म्हणजे १३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील १३ महसुली मंडलात विक्रमी तर सात मंडलात १०० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेत शिवारा सह शहरातील १५० नगरा मध्ये पाणी शिरल्याची घटना घडली.तर शहरातून जाणार्या तीन महाम्र्ग्ला नदीचे रूप आले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र आज जनजीवन हळूहळू पर्वपदावर आले आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली. या बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर येथे बुधवारी पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली. अवघ्या पाच तासात पाणीच पाणी दिसून आली. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे १३७.५,किणी येथे १३३.८ ,मैंदर्गी येथे ९९.५ , जेऊर येथे ८७.८,अक्कलकोट येथे ११६.८ , चपळगाव येथे ११६.८,तडवळ येथे ६६ मि.मी पावसाची नोंद झाली तर दक्षिण सोलापूर येथील वळसंग येथे ११६.८ , होटगी येथे १२५ , बोरामणी येथे ६५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे ८७.५, शेळगी येथे ११३१.५ मि.मी.पावसाची नोंद झाली.अक्कलकोट तालुक्यातील सात मंडलात अवघ्या पाच तासात १०० मि.मी. पेक्षा ज्सात पाउस झाला. येथील शेत शिवारात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले. अनेक गावांचा सांप्रत तुटला होता. ओढे नाले भरून वाहू लागल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले.

सोलापूर शहरातील जवळपास १५० नगरात पाणी साचल्याची घटना घडली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याचे विदारक चित्र होते. सोलापूर शहरातून जाणाऱ्या आठ महामार्गापैकी सोलापूर – तुळजापूर,सोलापूर –अक्कलकोट आणि सोलापूर – होटगी हे महाम्र्गाला चक्क नदीचे रूप आले होते. सोलापूर – होटगी महामार्गावरील पुलावर पाणी आल्याने पुढील गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.

ओढे,नाल्यावरील अतिक्रमणांमुळे फटका

शहरात अतिवृष्टी झाली असली तरी पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.शहरातील अनेक छोटे नाले,ओढे यावर बांधकाम,अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया थांबली आहे. शहरातील काही बांधकाम व्यावसायिकानी पालिकेच्या अधिकार्यांशी संगनमताने ओढे, नाले यांचा प्रवाह बंद करून तर काही ठिकाणी प्रवाहांचा मर्ग बदलला. तसेच काही ठिकाणी प्रवाहाचा मार्ग कमी केला. त्यामुळे वाहून जाणारे पाणी साचले हे एक प्रमुख कारण आहे. तसेच शहरातील कचरा,नाले सफाई झाली नसल्याची तक्रार आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढू : गोरे

नैसर्गिक आपत्ती आली. शहरात पाणी साचल्याने ओढे, नाले सफाईचा प्रश्न असो,कि अन्य कारणे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. भविष्यात अशी घटना घडणार यासाठी तातडीने उपाय योजना केल्या जातील. सकाळी अनेक भागाची पाहणी केली आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.