सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींसह महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. वीरशैव लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या काशीच्या जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींचे त्यांनी सोलापुरात भेटून आशीर्वाद घेतले.

भाजपने सोलापूरची उमेदवारी आमदार सातपुते यांना जाहीर केल्यानंतर लगेचच काल ते सोलापुरात दाखल झाले. त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर मंगळवारी, दुसऱ्या दिवशी आमदार सातपुते यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हेसुद्धा उपस्थित होते. निवडणूक प्रचाराचे नियोजन करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे आमदर सातपुते यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काशी येथील जंगमवाडी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचीही त्यांच्या होटगी येथील बृहन्मठात भेट घेऊन आमदार सातपुते यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या सोबत आमदार विजयकुमार देशमुख होते.