शासनाचा सामाजिक न्याय विभाग व नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडची (नॅब) सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८, २९ व ३० डिसेंबर रोजी अंध, अपंग मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पधार्ंमध्ये राज्यातून सुमारे चार हजार अंध व अपंग खेळाडू सहभागी होणार आहेत. पार्क स्टेडिअम व नॉर्थकोट प्रशाला क्रीडांगणावर आयोजिलेल्या या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दि. १३ रोजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व राज्यमंत्री सचिन अहिर हे उपस्थित राहणार आहेत. नॅबच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडास्पर्धामध्ये अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग चा पाच प्रवर्गातील अपंग मुला-मुलींचा सहभाग राहणार असल्याचे यलगुलवार यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
अंध,अपंग मुला-मुलींच्या राज्य क्रीडा स्पर्धा सोलापुरात
शासनाचा सामाजिक न्याय विभाग व नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडची (नॅब) सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८, २९ व ३० डिसेंबर रोजी अंध, अपंग मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पधार्ंमध्ये राज्यातून सुमारे चार हजार अंध व अपंग खेळाडू सहभागी होणार आहेत.
First published on: 11-12-2012 at 06:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur to host state sports competition for handicapped childrens