सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा येत्या १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी करण्यात आली आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, एम ए, एमकॉम, एम एससी, एमबीए, एमसीए आदी पारंपारिक व व्यवसायिक विद्याशाखांच्या सर्व विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन व तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात २४, तर ग्रामीण भागात ४७ असे एकूण ७१ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर मिळून सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. १५ जून ते २० जुलैपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिकचा वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली. त्यामुळे यंदा
ऑफलाईन पध्दतीने होणाऱ्या परीक्षेत राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे. तीन तासाचा पेपर असल्यास ४५ मिनिटे अधिक मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितली.