आगामी लोकसभा आणि विधानभा निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी दुहेरी लढाई पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत राज्यातील घडामोडी पाहता आघाडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं आहे की मविआत अॅडजस्टमेंट करावी लागणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंतांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “वेळ पडल्यास स्वबळावरही लढावं लागणार आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं राजकारण सुरू आहे, कोण कोणाला भेटतंय, कोण कोल्हापूर, कोणी मुंबई, कोणी चोरडियांच्या घरी भेटतंय. ही माहितीही तिथल्याच लोकांनी दिली. त्यामुळे झाली तर महाविकास आघाडी नाहीतर स्वबळवार लढण्याची तयारी ठेवा. तिथली अधिकृत माहिती आहे, काँग्रेसचेही लोक संपर्कात असू शकतात असं त्याचं चाललं आहे.
हेही वाचा >> “नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाने….”, काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप
“अजित दादा महायुतीत आल्यामुळे पुतण्या म्हणून शरद पवार भेटत असले तरी पवारांची भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा काल बैठकीत झाल्याचं सूत्रांकडून कळतंय”,असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
इंडियाबद्दल आम्हाला अभिमान
“महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नाही. इंडिया आघाडीची बैठक घेऊन फार मोठं काही साध्य होईल असं वाटत नाही. इंडिया नाव ठेवून भारताबद्दल खरा आदर्श कोणाला आहे हे सर्वांनी पाहिलंय. इंडियाबद्दल, भारताबद्दल, हिंदुस्तानाबाद्दल केंद्र सरकारला अभिमान आहे. राम मंदिर कोणी बांधलं? ३७० काश्मीर कलम कोणी रद्द केला? इंडियाबद्दल खरा अभिमान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारला आहे.
