रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ओझरखोल येथे गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि मिनी बस समोरासमोर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले आहेत. एकमार्गी रस्ता सुरु असताना एका ट्रकला मागे टाकण्याच्या नादात मिनी बस एसटी वर जावून धडकली. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, दोन्ही बस एकमेकात शिरल्याने केबिनमध्ये अडकलेल्या मिनी बस चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसिबीच्या मदतीने बस मागे ओढून काढण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथून चिपळूण कडे जाणारी एसटी बस (एमएच२० बीएल ४०३८) ही संगमेश्वर येथील ओझर खोल येथे आली असताना समोरुन येणा-या मिनी बस (एमएच ०८ एपी ४५२७) हिची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही बस कीरण रहाटे हा चालवीत होता. एकमार्गी रस्ता सुरु असताना समोर असणा-या एका ट्रकला मागे टाकण्याच्या नादात ही मिनी बस एसटीच्या चालक भागावर जोरदार धडकली. या अपघात ३४ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. मिनी बस मध्ये प्रवासी जास्त असल्याने यातील सर्वच प्रवासी जखमी झाले.

दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघात मिनी बस चालक गंभीर जखमी होवून केबिन मध्येच अडकून पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी जेसिबीच्या सहाय्याने एकमेकात अडकलेल्या गाड्या ओढून चालकाला बाहेर काढण्यात आले. अपघातातील सर्वच जखमींना तात्काळ संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.

महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली. पोलिसांकडून या अपघातग्रस्त गाड्या बाजुला केल्या नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातामध्ये किरण रहाटे (मिनी बस चालक), अतुल पांडुरंग पिटले (सावर्डे), आशिष प्रमोद विभुते (देवरुख, मिनी बस क्लीनर), तन्वी (चिपळूण), सायली संतोष हेगडे (निवळी), अनिश अनिल पाटणे (कोळंबे), आयुष संजय मयेकर (मिऱ्या रत्नागिरी), मंगेश विजय दुधाणे (एसटी बस वाहक), सचिन बाबासाहेब केकान (ओझरखोल), संतोष तानाजी गायकवाड, रामचंद्र फेपडे, रघुनाथ पाठक, राजू चोचे, शेखर सतीश साठे, सुशील धोंडीराम मोहिते, सरिता धोंडीराम मोहिते, अजय रामदास भालेराव, अनुराधा शिवाजी धनावडे, विनय विश्वनाथ प्रसादे, सुशील दत्ताराम मोहिते, उमामा मुल्लाजी, अनिकेत अनंत जोगले, किरण राठी, रामचंद्र बाबू, वैशाली सिद्धार्थ सावंत, अहर्ता संतोष सावंत, केतन श्रीकृष्ण पवार, सिद्धार्थ गोपाळ सावंत, सारा हबीब फकीर, अण्णा बाबासाहेब पवार आदी प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाटाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.