अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रातील मतदारांच्या किमान व कमाल संख्येबाबत फेररचना केली आहे. या सुधारित आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदान केंद्रावर कमीतकमी ७०० व जास्तीत जास्त ८०० मतदार, नगर परिषदेसाठी एका केंद्रावर ८०० ते ९०० व नगर पंचायतसाठी ९०० ते १००० मतदार असतील.

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगर परिषद व पंचायतच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यासाठी कमाल व किमान मतदार संख्या निश्चित केली आहे. मतदाराला त्याच्या घरापासून दोन किमी.च्या आत मतदान केंद्र उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका मतदान केंद्रावर किमान १ हजार ते कमाल १५०० मतदार संख्या होती. आता त्यात घट होणार असल्याने मतदार केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात अहिल्यानगर महापालिका, ११ नगर परिषदा व एका नगर पंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्रच होणार असल्याने या निवडणुकीत एका मतदान केंद्रावर कमीतकमी ८०० व जास्तीतजास्त ९०० मतदार असणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मतदान केंद्रांची संख्या वाढेल.