क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग इथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ क्रीडा संकुलात येत्या ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ या वयोगटांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यातील आठ विभागांतून २८८ खेळाडू, तर राज्यस्तर टेबल टेनिस निवड चाचणी करता १४४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ११ तारखेला सकाळी साडेनऊला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था आरसीएफ संकुलात करण्यात आली आहे. तर या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट संघ आणि खेळाडूंची दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
रायगडात राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग इथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ क्रीडा संकुलात येत्या ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
First published on: 05-12-2012 at 06:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level school table tennis tournament arranged in raigad