परळी वीज केंद्राकडे १६२ कोटींची थकबाकी असताना त्यांना वेळोवेळी पाणी सोडले जाते. मात्र, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही. किमान एक टक्का तरी पाणी कालव्यात सोडा, अशी मागणी करत माकप जिल्हा समितीने सोमवारी जायकवाडी कार्यालयात आंदोलन केले. अभियंते उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्यात आले.
जायकवाडी धरणात ६.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परभणी तालुक्यातील दुष्काळी भागात पिण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी माकपने केली होती. मात्र, कालव्यात पाणी सोडण्याऐवजी १६ मे रोजी परळी औष्णिक वीज केंद्रासाठी पाणी सोडले. २१ मे ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच २६ मे ला मोर्चा काढला. त्यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मोच्रेकऱ्यांना दिले होते. रविवारी सकाळी परभणी तालुक्यातील कालव्यात पाणी आले. मात्र, केवळ १ मीटरने पाणी येत होते आणि रात्री ८ वाजता हे पाणी बंद झाले. या बाबत विचारणा केली असता वरून पाणी बंद झाले, असे उत्तर मिळाले. सरकार व अधिकाऱ्यांना माणसे जगवण्याची काळजी नसून, कारखाने जगविण्याची धडपड आहे. धरणात पिण्यापुरते पाणी असूनही सोडले जात नाही. औष्णिक वीज केंद्राने ५ दलघमी पाण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना जास्तीचे २४ दलघमी पाणी सोडण्यात आले. हे पाणी खडका बंधाऱ्यात केवळ १ दलघमी पोहोचले. या केंद्राकडे १६२ कोटींची बाकी असताना त्यांना ३ टक्के पाणी सोडू शकते. मग शेतकऱ्यांसाठी एक टक्का का नाही, असा सवाल माकपने केला. या पाश्र्वभूमीवर येथील जायकवाडी कार्यालयात माकपने आंदोलन केले. मात्र, निवेदन घेण्यास अभियंते उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदनाची प्रत डकविण्यात आली.
जायकवाडीचे अधीक्षक अभियंता, विभागीय आयुक्त, जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. विलास बाबर, माणिकराव सूर्यवंशी, वसंत कदम, पांडुरंग पवार, प्रभाकर जांभळे, बाजीराव सोगे, तुकाराम कानडे, रामभाऊ खिस्ते, राजेभाऊ राठोड, बाळासाहेब गोरे, बंडू जाधव आदींच्या सह्य़ा आहेत. आंदोलनात सुरिपप्री, बोरवंड, िपपळगाव, वडगाव, इंदेवाडी, उजळअंबा, उमरी आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2015 रोजी प्रकाशित
जायकवाडी पाण्यासाठी खुर्चीला निवेदन डकवले!
परळी वीज केंद्राकडे १६२ कोटींची थकबाकी असताना त्यांना वेळोवेळी पाणी सोडले जाते. मात्र, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही. किमान एक टक्का तरी पाणी कालव्यात सोडा, अशी मागणी करत माकप जिल्हा समितीने सोमवारी जायकवाडी कार्यालयात आंदोलन केले.

First published on: 02-06-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement pest to chair for water of jayakwadi