एखाद्या व्यक्तीच्या अंगावरील सोनसाखळी व इतर मौल्यवान वस्तू हिसकावणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसावी, यासाठी राज्य सरकारने याबाबतची शिक्षेची तरतूद अधिक कडक केली आहे. त्यानुसार अशा प्रकारातील दोषींना किमान दोन व कमाल पाच वर्षे सश्रम कारावास होऊ शकेल. असे करताना दोषीकडून संबंधित नागरिकास  दुखापत झाल्यास किमान तीन व कमाल पाच वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड अशा कडक शिक्षेची तरतूद करण्यासाठी भारतीय दंड संहिता १८६० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये कलम ३७९ नंतर कलम ३७९-अ (१)(२) आणि ३७९-ब अंतर्भूत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
सोने व इतर मौल्यवान दागदागिने चोरून सहजरित्या आर्थिक लाभ मिळविण्याची प्रवृत्ती वाढते आहे. विशेषत: शहरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चोरण्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच अशा प्रकारच्या काही घटनांमध्ये काही नागरिकांना आर्थिक नुकसानीबरोबरच जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी संबंधित गुन्हेगारांना अधिकाधिक कडक शिक्षा ठोठावण्याची जनभावना होती. त्यानुसार मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला.
या निर्णयानुसार कलम ३७९-अ (१)नुसार हिसकावणे या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. तर कलम ३७९-अ (२) नुसार हिसकावण्याबद्दल किमान दोन व कमाल पाच वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ३७९-ब नुसार दुखापत करून किंवा धाक दाखवून ऐवज हिसकावणाऱ्यास किमान तीन व कमाल पाच वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात केली जाणार आहे.

madhya pradesh sidhi rape
आवाज बदलण्याच्या ॲपचा वापर करून शिष्यवृत्तीचे आमिष आणि ७ विद्यार्थीनींवर बलात्कार; मजूर आरोपी ‘असा’ पकडला गेला
Diwya tanwar success story
गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…
Understanding TCS Rules, Tax Implications on Foreign Remittances, Tax Collected at Source, Capital Gains, send money india to foreign country, marathi news,
‘टीसीएस’च्या तरतुदी काय?
medical professionals consumer court
वकिलांप्रमाणे आता डॉक्टरांनाही ग्राहक संरक्षण कायद्यातून मिळणार सूट? सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं?
Nagpur rape, rape mentally challenged marathi news
नियतीचा न्याय! ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच…
Indians hoping to emigrate Canada LMIA work permits
कॅनडात जाणाऱ्यांसाठी LMIA ठरतोय आधारवड; काय आहे नियम आणि कशी असते प्रक्रिया?
right to education latest marathi news, right to education marathi news
शिक्षण हक्क हवा, मात्र पात्र विद्यार्थ्यांसाठीच!
lokmanas
लोकमानस: आदेशाआधी विचार केल्यास नामुष्की टळेल