Viral Photo: काही दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली आणि सध्या त्यांच्या उन्हाळ्याची सुट्या सुरू आहेत. शाळेत काही विद्यार्थी असे असतात की, जे उत्तरपत्रिका खूप छान पद्धतीने लिहून चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात. पण, काही अतरंगी विद्यार्थी असेदेखील असतात, जे पेपरमध्ये काहीही लिहितात. अनेकदा अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका समाजमाध्यमावर खूप व्हायरल होतात. दरम्यान, आता नुकताच असाच एक फोटो व्हायरल होत आहे; ज्यात एका विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिकेतील हटके निबंध पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.
अनेकदा समाजमाध्यमावर शाळेतील, तसेच महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपासून असे अनेक उत्तरपत्रिकांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर आता एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतेय.
या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, या उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्याला माणसांना पंख असते तर..! या विषयावर आधारित निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. यावेळी त्या विद्यार्थ्याने जे लिहिले होते ते वाचून तुम्हीदेखील कपाळावर हात मारून घ्याल. या विद्यार्थ्याने निबंधामध्ये लिहिलेय, “आजकाल आपण समाजात बघतो की, माणसांना पंख नसतात, तेदेखील ते दुसऱ्यांवर उडतात. माणसांना जर खरोखर पंख असते, तर ते दुसऱ्यांवर अजून जास्त उडाले असते. आशा आहे की, समाजातील हे कटू सत्य मी या निबंधात लिहिल्यामुळे सर तुम्ही माझ्यावर उडणार नाही.” असा अतरंगी निबंध विद्यार्थ्याने लिहिला आहे. त्याच्या सरांनीदेखील त्या विद्यार्थ्याला निबंधासाठी १० पैकी १० गुण दिले आहेत. हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे.
पाहा फोटो:
या व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवरील @ag_creation_004 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या अनेक उत्तरपत्रिका व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी एका उत्तरपत्रिकेत “मला काहीच माहीत नाही. तुम्ही मला याचं उत्तर विचारू नका”, असे लिहिले होत. दुसऱ्या एकाने त्याच्या उत्तरपत्रिकेत ‘जय श्रीराम’,असे लिहिले होते. आणखी एकाने लिहिले होते, ‘जय माता दी.’ तर, एकाने तर प्रश्नपत्रिकेत बूथ लेव्हल अधिकारी (बी.एल.ओ.)चा अर्थ काय, अशा प्रश्नावर बी.एल.ओ. हे एका आजाराचं नाव आहे, असे लिहिले होते.