सरकारने जाहीर केलेल्या एफआरप्रमाणे उसाला भाव देण्याचे मांजरा परिवाराने ठरवले आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देवणी तालुक्यातील जागृती साखर कारखान्याने उसाला २ हजार ३८ रुपये ७५ पसे दर जाहीर केला. सुरुवातीला दीड हजार रुपयांची उचल देण्यात आली. त्यानंतर मकरसंक्रांतीनिमित्त १०० रुपयांचा हप्ता व आता उर्वरित ४३८ रुपये ७८ पसे प्रतिटनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. चालू हंगामात जागृती शुगरने २ लाख ९० हजार २६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख २१ हजार १०० क्विंटल साखर उत्पादित केली. साखर उतारा ११.२९ टक्के आहे.
रेणा साखर कारखान्याने उसाला २ हजार १०३ रुपये ५३ पसे भाव जाहीर केला. कारखान्याने पहिली उचल दीड हजार रुपये, दुसरी १०० रुपये व आता उर्वरित ५०३ रुपये ५३ पसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. मांजरा साखर कारखान्याने प्रतिटन १ हजार ८११ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने सुरुवातीला दोन हप्त्यांत १ हजार ६०० रुपये दिले. आता उर्वरित २११ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
मांजरा परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्व साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतला. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत आला. साखर उद्योगातील चढउतारामुळे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले, तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, प्रसंगी तोटा सहन करून कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी हा निर्णय घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2015 रोजी प्रकाशित
‘जागृती’, ‘रेणा’, ‘मांजरा’चा ऊसदर एफआरपीप्रमाणे जाहीर
सरकारने जाहीर केलेल्या एफआरप्रमाणे उसाला भाव देण्याचे मांजरा परिवाराने ठरवले आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवणी तालुक्यातील जागृती साखर कारखान्याने उसाला २ हजार ३८ रुपये ७५ पसे दर जाहीर केला. सुरुवातीला दीड हजार रुपयांची उचल देण्यात आली.
First published on: 04-02-2015 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane rate announced as frp of jagruti rana manjara