अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात महायुतीसह जात सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदारही गेले. त्यांचं हे बंड यशस्वी ठरलं आणि राष्ट्रवादीत फूट पडली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सामनामध्ये भाजपाच्या मांडीवर या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून अजित पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सुनेत्रा वहिनींनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते. त्यांनी तो आत्मनिर्धारच केला होता. त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीही ठोस सापडलं नाही. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यावर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा पवारांनी आणि त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नाही तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे गिळून ढेकर दिला की आणखी काही केले?

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले का?

भ्रष्टाचाऱ्यांना साथ देण्याची मोदी गॅरंटी फडणवीस यांनी अमलात आणली ती अशी. फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपांखाली फडणवीसांव गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुराव्यांशी छेडछाड करणे हा अपराध आहे. पोलिसांनी पुरावा असतानाही कुणाच्या दबावामुळे अजित पवारांची शिखर बँक घोटाळा फाईल बंद केली असेल तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना पार्टी करुन हायकोर्टात दाद मागितली गेली पाहिजे.

हे पण वाचा- “..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

सुनेत्रावहिनी तुम्ही..

भ्रष्टाचार-भ्रष्टाचार असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या आणि माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत. तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा खटलाच चालवायाला हवा. कुणीही उठायचे आणि बदनामीचा चिखल उडवायचा हे बरे नाही. असा उल्लेख सामनात करण्यात आला आहे.