Sunil Tatkare On Ajit Pawar, Amit Shah Meet Sharad Pawar : शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान या भेटींमुळे सध्या राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादानेच आमची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणे, दर्शन घेणं हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे”. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शरद पवारांच्या भेटीला गेले. संपूर्ण देशभारत एक वेगळंच वातावरण असतं, राजकीय क्षेत्रामध्ये वेगळ्याच चर्चा केल्या जातात याच्या पलीकडे आज उत्तम सद्भावना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाखवल्या आहेत.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar : “तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नही…”, आशिष शेलारांचा शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

“शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानेदेखील देशातील सर्वपक्षीय नेते एकाच वेळी पवार साहेबांच्या निमित्ताने २०१५ साली व्यासपीठावर एकत्र आले होते. ही आपली संस्कृती आहे”, असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले.

शरद पवार आणि अजित पवार भविष्यात एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. याबद्दल विचारले असता तटकरे म्हणाले की, “कृपा करून मी सर्वांना विनंती करतो की आज आम्ही आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भेटलो आहोत. आजच्या सदिच्छा भेटीला राजकीय वळण देणे त्याला छेद देणारे ठरेल. यातून कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढू नये अशी माझी विनंती आहे”, असेही तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा>> “… म्हणून मविआला ५० च्या खाली रोखलं” जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विधानसभा निकालावर…

उलट महायुती भक्कम होईल – दरेकर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील अजित पवार-शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, “राजकीय वर्तुळात चर्चा तर होत असतात, पण शरद पवार देशातील ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत आणि मला वाटतं अमित शहा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले असतील. आता दोन नेते एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होऊ शकते. पण मला वाटतं नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा वारंवार गौरव केला आहे. त्यांचं राजकारणातील मोठेपण जाहीरपणे कबूल केले आहे. त्यामुळे अमित शाह शुभेच्छा देण्यासाठी गेले असतील”.

शरद पवार- अजित पवार एकत्र आल्याने महायुतीला फटका बसणार का? या प्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले की, “याचा महायुतीला फटका बसणार नाही, उलट युती आणखी भक्कम होईल आणि फायदाच होईल. शरद पवार हे जर अजित पवारांबरोबर आले तर आम्ही आणखी भक्कम होऊ. त्यांचे आमदार-खासदारांचा उपयोग होईल.”

Story img Loader