मागील अनेक दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने त्यांना ते दावा करत असलेले चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान केले होते. त्यानंतर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पत्नी त्यांना रोज मारहाण करायच्या असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानाचा निषेध आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण महाराजांचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे

“धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >>> मोठी बातमी! सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

धीरेंद्र कृष्ण शास्त्री नेमकं काय म्हणाले?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

हेही वाचा >>> “बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “शिंदे सरकार…”

धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागावी

दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानावर भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे तुषार भोसले म्हणाले आहेत. “बागेश्वर धाम तथा धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. हा फक्त संत तुकाराम महाराज नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही मागणी करतो की धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तसेच महाराष्ट्राची माफी मागावी,” अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.