छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर केला होता. अमोल कोल्हेंच्या या आरोपांनंतर आता विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली असून ही घटना पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याचे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – VIDEO: “महाराष्ट्रातून दरवर्षी ४ हजार मुली, तर ६४ हजार महिला बेपत्ता होतात आणि…”, चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. “खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करीत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी-चिंचवड येथील प्रयोगादरम्यान या महानाट्याच्या मोफत प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“गृहमंत्र्यांनी तातडीने याची दखल घ्यावी”

“खासदार असणाऱ्या डॉ. कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते. ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – पुणे : चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी काल व्हिडीओ ट्वीट करीत मोफत तिकिटांसाठी पोलिसांकडून धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. “आज पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचे नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकीट मागण्याची आहे. अगदी शेवटी ३०० रुपयांचे तिकीट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule reaction after amol kolhe allegation on pimpari chinchwad police spb
First published on: 14-05-2023 at 11:57 IST