Sushma Andhare taunt kirit somaiya over narayan rane adhish bunglow ssa 97 | Loksatta

“अतिक्रमण विभागाचे सहाय्यक हातोडा घेऊन अधीशवर…”, शिवसेनेचा किरीट सोमय्यांना खोचक टोला

Shivsena Vs Kirit Somaiya : नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर शिवसेनेने किरीट सोमय्यांना डिवचलं आहे.

“अतिक्रमण विभागाचे सहाय्यक हातोडा घेऊन अधीशवर…”, शिवसेनेचा किरीट सोमय्यांना खोचक टोला
नारायण राणे किरीट सोमय्या ( संग्रहित छायाचित्र )

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंना अधीश बंगल्यातील बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत राणेंची याचिका फेटाळली आहे. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

“जरा कुठेही खुट्ट झालं तरी ज्येष्ठ समाजसुधारक किरीट सोमय्या फार तत्परतेने व्यक्त होतात. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी कोकणात हातात हातोडा घेऊन गेले होते. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर किरीट सोमय्या शांत होते. ही सहनशीलता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईलपर्यंत सोमय्यांनी दाखवली आहे,” असा खोचक टोला अंधारे यांनी सोमय्यांना लगावला आहे.

हेही वाचा – मधुकर पिचडांच्या सत्तेला २८ वर्षानंतर राष्ट्रवादीने लावला सुरुंग; अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर

“नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यातून वेळच…”

“आता सर्वोच्च न्यायालयाने अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सांगितलं आहे. भाजपाचे पूर्णवेळ ज्येष्ठ सामाजिका कार्यकर्ते आणि अतिक्रमण विभागाचे सहाय्यक किरीट सोमय्या आता हातोडा घेऊन अधीश बंगल्यावर जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहेत. की नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यातून वेळच मिळणार नाही,” असा टोमणाही सुषमा अंधारे यांनी सोमय्यांना मारला आहे.

हेही वाचा –

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

उच्च न्यायालयाने अधीश बंगल्यातील अनधिृकत बांधकाम पाडण्याचा निकाल दिला होता. त्याविरुद्ध नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दार ठोठावले होते. यावर आज ( २६ सप्टेंबर ) सुनावली पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ”तुम्हाला तीन महिन्यांची मुदत जास्तीत जास्त देता येईल. तीन महिन्यांमध्ये तुम्ही स्वत: हे बांधकाम काढा. जर नियमानुसार केलं नाहीतर पुढील कारवाईसाठी मुंबई पालिकेला मुभा असेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये माजला गदारोळ

संबंधित बातम्या

VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार