सातारा: सासवडे (ता. सातारा) येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सातारा पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या राहुल यादव या आरोपीने यापूर्वी गावातीलच आणखी एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
१० ऑक्टोबर २०२५ रोजी यादव याने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून खून केला होता. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटले होते. या प्रकरणाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व धोंडीराम वाळवेकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यादव याला अटक करून तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल बबन यादव याने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सासपडे गावातील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि तो मृतदेह विहिरीत टाकला, अशी कबुली दिली.
बोरगाव पोलिसांनी हा गुन्ह्याचा फेरतपास सुरू केला आहे. हा तपास सातारा येथील पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. या खुनाबद्दल बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून या आरोपीचा ताबा मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा यांना लेखी अहवाल देण्यात आला. या गुन्ह्यात यादवला स्वतंत्र अटक दाखवून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
१० ऑक्टोबर २०२५ रोजी यादव याने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून खून केला होता. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटले होते. या प्रकरणाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व धोंडीराम वाळवेकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यादव याला अटक करून तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
