सांगली : सांगलीपासून जवळच असणाऱ्या कवलापूर ग्रामपंचायतीजवळ दोन तरुणाकडून १ कोटी पाच लाखाचे सुमारे दोन किलो संशयास्पद सोने पोलीसांनी हस्तगत केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीवेळी संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिक्षक बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. यानुसार सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार व संदिप शिंदे यांचे पथक गस्त घालत होते. कवलापूर पंचायतजवळ दोन तरुणांना संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ १ किलो ९९४ ग्रॅम सोने बार स्वरुपात मिळाले. याचे मूल्य १ कोटी ५ लाख  ६८ हजार दोनशे रु. आहे.

या प्रकरणी रोहित चव्हाण (२७) व संतोष नाईक (२६) या दोघांना ताब्यात घेतले. सोन्याबाबत विचारले असता त्यांनी हे सोने विक्रम मंडले ज्वेलर (रा.बांबवडे सध्या जालना) यांचे असल्याचे सांगितले. मात्र मालकी सिध्द करणारी कागदपत्रे नसल्याने संशयास्पद सोने व तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious gold worth crores seized in sangli local crime investigation department ysh
First published on: 19-12-2022 at 20:19 IST