सांगली : एक वोट, एक नोट या तत्वावर सांगली लोकसभा निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेने संधी दिली तर निवडणूक लढविण्याची तयारी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दर्शवली.

संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामधामवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष खराडे, पोपट मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे संजय बेले, भागवत जाधव आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-सातारा: स्वच्छ भारत अभियानात पाचगणी पालिका पश्चिम विभागात प्रथम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी खराडे म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील लोकसभेच्या सहा जागा लढविण्याची घोषणा केली असून कोणाही बरोबर आघाडी करण्यात आलेली नाही. या सहा जागामध्ये सांगलीचा समावेश असून पक्ष ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे. उस व दूध दर, द्राक्ष, बेदाणा कर्जमाफी, दिवसा वीज आदी प्रश्‍नावर सुरू असलेला संघर्ष घराघरापर्यंत पोहचवून ही निवडणूक लढवली जाईल. एक वोट, एक नोट या तत्वावर निवडणूक लढविण्यात येणार असून यावेळी निवडणूक खर्चासाठी १ लाख ७५ हजाराची मदत देण्याची घोषणा कार्यकर्त्यांनी केली.