रत्नागिरी – मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी सावंत या विद्यार्थीने अभिनयाचे डबल पारितोषिक पटकावले. या तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गतवर्षी लोकसत्ताच्या लोकांकिका स्पर्धेत तिने निवेदनाची उत्कृष्ट कामगिरी पार पाडली होती.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सवासाठी अंतिम फेरीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची विद्यार्थिनी तन्वी सावंत हिने हिंदी एकांकिकेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले तसेच मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये देखील रौप्य पदक पटकावले आहे.
यावेळी मराठी अभिनय एकपात्री स्पर्धेसाठी आगळी वेगळी कथा घेण्यात आली होती. प्रत्येक पात्राच्या दोन बाजू असतात आणि हे फक्त खऱ्या नाटकप्रेमींना कळू शकते. गेल्या अनेक वर्षांपूर्वी रंगभूमीवर एक नाटक बंद पडलं. ‘सखाराम बाईंडर’ ज्या मधून विजय तेंडुलकर यांनी स्री-पुरुष संबंधांवर अत्यंत वास्तववादी आणि स्फोटक विषय मांडला आहे. त्यामुळे त्या काळात त्या नाटकाच्या चालू प्रयोगात लोकांनी अंडी आणि टोमॅटो फेकून मारले, आणि या नाटकाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली. ज्यामध्ये त्या नाटकाची समाजाला न दिसलेली बाजू मांडण्याचा मी एक प्रयत्न केला. ज्यामध्ये चंपा हे पात्र साकारून त्या नाटकाची दुसरी बाजू जगा समोर आणली. चंपाचे पात्र नाटकातील स्त्री-पुरुष संबंधांचे आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करते. हे नाटक घरगुती हिंसाचारासारख्या गंभीर सामाजिक विषयांना हाताळते, ज्यामध्ये चंपाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यात चंपाचा निडर स्वभाव चौकटी बाहेरील तीची विचारसरणी या वर ती मी काम केले आहे, असे मत तन्वी सावंत हिने व्यक्त केले.
याचे पुनर्लेखन आणि दिग्दर्शन वेदांग सौंदलगेकर यांनी केले. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.