सोलापूर : अवघ्या पाच दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवीन टियागो मोटार शेतात झाडाखाली सावलीत लावण्यासाठी सुरू केली असता नियंत्रण सुटल्याने समोरील शेतामधील विहिरीत कोसळली. त्यात एका  शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारात रविवारी दुपारी घडली. ईरण्णा बसप्पा जूजगार ( वय ४१ वर्ष , रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अध्यापन करीत होते.

हेही वाचा >>> मुंबई गोवा महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकर मान्यांचे प्रचंड हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच दिवसांपूर्वीच त्यांनी टाटा कंपनीची टियागो नवीन मोटार कार ( एमएच १३ ईसी ६०६८ ) खरेदी केली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी ते डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे  कुटुंबासोबत आले होते. नवीन मोटार खरेदी केल्यामुळे त्यांना शेतशिवारात पेढेही वाटायचे होते. दुपारी सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय व कार चालक घरात गेले. तेव्हा  ईरण्णा झुजगार हे चालकाच्या आसनावर बसले आणि ही मोटार झाडाखाली सावलीत लावण्यासाठी सुरू केली. परंतु पुरेशा वाहन चालविण्याचा पुरेसा अनुभव नसल्यामुळे नियंत्रण सुटल्याने मोटार  क्षणार्धात सुसाट वेगात समोरील  विहिरीमध्ये जाऊन कोसळली. नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने ईरण्णा जुगदार यांना पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे  डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.