सांगली : सांगलीतील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकांला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाउन चोप दिला. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी मनसेने संस्था चालकाकडे केली. संस्थेनेही याची गांभीर्याने दखल घेत संबंधित शिक्षकास निलंबित करण्यात येत असल्याचे सांगितले असल्याचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांनी सांगितले.

सांगलीतील एका नामांकित शाळेत सहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या वादग्रस्त शिक्षकांने गैरवर्तन केल्याचा प्रकार संबंधित मुलीने आपल्या मैत्रिणीना सांगितला.यावेळी अन्य मुलींनीही असाच प्रकार आपल्याबाबतही झाला असल्याचे सांगितले. ही बाब पालकांना समजताच पालकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली.

आणखी वाचा-तुळजाभवानी चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी २८ लाखाची रोकड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी मनसेचे जिल्हा प्रमुख सावंत यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत जाउन विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकाला बेदम चोप दिला. अशा विकृत शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी संस्था चालकांकडे करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन संस्थेनेही या शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे मनसे पदाधिकार्‍यांना सांगितले.