सांगली : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याकडे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही अनुपस्थित राहिल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची होणारी राजकीय कोंंडी टळली.

स्व . आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास व अमोल बाबर यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या शुभारंभ निमित्त आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या निमित्ताने बाबर गटाचे राजकीय वारसदार सुहास बाबर यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब करून प्रचाराचा शुभारंभ महायुतीतील तीन वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्याचे प्रयोजन होते.

हे ही वाचा…सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल अन् पाण्याखाली बोट प्रकल्प ; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

तथापि, स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तसेच भाजपमधून आमदा गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर हेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनीही आपण निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महायुतीमध्येच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असताना केवळ शिंदे शिवसेनेच्या निवडणुकीचा प्रचार होईल म्हणून महायुतीतील मित्र पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि वीज वितरण कंपनीच्या संचालिका आणि भाजपच्या महिला नेत्या नीता केळकर या केवळ उपस्थित होत्या.

हे ही वाचा…चावडी :  १५० किलोंचा पैलवान !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याकडे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.