इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. अनेक दिवसांपासून या परीक्षांच्या वेळापत्रकाची सर्वांनाच प्रतिक्षा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रात होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने गही परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.  परिक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं आहे.

दहावी-बारावी परीक्षांबाबत निर्णय परिस्थितीनुसार

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार? याची चर्चा सुरू होती. मात्र, परीक्षेला अद्याप दोन महिने असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने तीन दिवसांअगोदर दिलं होतं.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने काही जिल्ह्य़ांतील शाळा-महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार याची चर्चा विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये सुरू झाली होती.

राज्य माधयमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सचूनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

अगोदरच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत २२ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात सूचना मागवण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth twelfth examination schedule announced msr
First published on: 26-02-2021 at 20:11 IST