सातारा : महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे दि २ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आहे.पुणे बंगळूर महामार्गावरून महाबळेश्वर जाणाऱ्या सुरुर वाई महाबळेश्वर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाला रस्ते दुरुस्तीचा अडथळा ठरत आहे.यामुळे प्रशासन व संबंधित ठेकेदाराने वाहतूकीचे व्यवस्थित नियोजन करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी केली आहे.

महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे दि २ ते ४ मे आयोजन करण्यात आले आहे.शासनाकडून त्याची मोठया प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे.यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक,मंत्री मंडळातील सदस्य,प्रशासकीय अधिकारी भेट देण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर ला जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे.ठेकेदाराने संपूर्ण रास्ता खोदून ठेवला आहे. या मार्गावरील मोठ्या प्रमाणात ब्रिटिशकालीन झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील स्थानिक ग्रामस्थ व्यावसायिक आंदोलनाच्या आहेत. रस्ता दुरुस्त करताना एक मार्गाचा वापर न केल्याने दोन्ही मार्गिका प्रभावित झाल्या आहेत.त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक प्रभावित होणार आहे.हा मार्गच महोत्सवातला मुख्य अडथळा ठरणार आहे.

पुण्याहून महाबळेश्वर किंवा महाबळेश्वर वाई वरून पुण्याला जाणारी सगळी लहान व मोठी अवजड वाहने अजूनही याच रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.लहान मोठे अपघात व वाहन धारकांच्या वादावादीच्या घटना वारंवार घडत आहेत.मिळेल त्या मार्गाने पर्यटक वाई पाचगणी महाबळेश्वर ला रोजंदारीवर जाणारे स्थानिक येजा करत आहेत.मात्र नियोजना अभावी हा रास्ता वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे.हे काम सुरु असल्याने महाबळेश्वर महोत्सवाला मोठा अडथळा होणार आहे.त्यामुळे एक मार्गीकेचे काम सुरु असताना दुसरी मार्गिका सुरु राहावी अशी मागणी स्थानिकानी केली आहे.महाबळेश्वर महामहोत्सवाला रस्ता दुरुस्तीचा अडथळा ठरत आहे