सोलापूर शहरात मोकाट व भटके कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून श्वानदंशामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु वारंवार प्रश्न चव्हाट्यावर येऊनही महापालिका प्रशासन जागे होत नव्हते. अखेर उशिरा का होईना मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी यंत्रणेला जाग आली आहे. पुढील तीन वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नंदूरबारच्या एका संस्थेला मक्ता देण्यात आला आहे. यात एका कुत्र्याच्या निर्बिजीकरण व लसीकरणामागे येणारा खर्च पाच कोटी १२ लाख ५० हजार रूपये एवढा आहे. शिवाय यात पारदर्शकता अधिक महत्वाचा ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे रस्त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर जुना जकात नाक्याच्या जागेवर शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचे  निर्बिजीकरण व लसीकरण केले जाणार आहे. या कामाचा मक्ता  नंदूरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आलेला आहे. २०२६ पर्यंत निर्बिजीकरण व लसीकरण करून मोकाट व भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या घटविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने आदेश दिल्यानंतर पालिका यंत्रणा जागची हलली आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत ३४०० मोकाट व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरणाचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. निर्बिजीकरण व लसीकरणानंतर कुत्र्यांना, ती जेथून आणली, तेथेच पुन्हा नेऊन सोडले जाणार आहे.

हेही वाचा >>> सातारा पालिका हद्दवाढ भागातील घरपट्टी आकारणी; शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

शहरात एका सर्वेक्षणानुसार मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे ४१ हजार एवढी आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. गावठाण भागासह शहर हद्दवाढ भागात, शेळगी, दहिटणे, मजरेवाडी, जुळे सोलापूर, बाळे आदी बहुतांश ठिकाणी घोळक्याने भटकणा-या कुत्र्यांकडून लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले होतात. अनेक वाहन धारकांना त्रास सहन करावा लागतो. श्वानदंशामुळे काहीजणांना जीव गमवावे लागले असून हजारो व्यक्तींना प्रसंगी मोठा आर्थिक भुर्दंड सोसून वैद्यकीय उपचार करावे लागते.

शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय तसेच मक्तेदारा कडून हेल्पलाईन क्रमांक ७६६६५१३०२६ जारी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The municipal administration for disinfection stray dogs ysh
First published on: 13-10-2023 at 19:25 IST