सांगली : गेल्या चार दशकांची प्रतिक्षा असलेले कृष्णेचे पाणी मायथळ कालव्यातून जत पूर्व भागातील माडग्याळ ओढ्यात पोहोचले. या पाण्याचे पूजन सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. जतचा दुष्काळग्रस्त भाग पाण्यापासून वंचित राहू नये अशी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

माडग्याळ ओढ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यानंतर भाजपाचे खासदार पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, सरदार पाटील आदींच्या हस्ते या पाण्याचे पूजन रविवारी करण्यात आले. यावेळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरही उपस्थित होते.

हेही वाचा – केंद्राच्या आक्षेपांमुळे डॉ. रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती रखडली?

हेही वाचा – सांगली : विचित्र हवामानामुळे द्राक्षावर करपा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायथळ कालव्याद्बारे जतच्या पूर्व भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी गेली सात ते आठ महिने प्रयत्न सुरू होते. यावेळी वन विभागाने कालवा काढण्यासाठी विरोध दर्शवला होता. यामुळे हे काम रखडले होते. मात्र, सर्वच पक्षांच्यावतीने प्रयत्न केल्याने पूर्व भागातील लोकांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न साकारले असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले, तर आमदार पडळकर यांनी या भागातील लोकांची दुष्काळापासून मुक्तता व्हावी अशी सर्वांचीच भावना असल्याचे सांगितले तर माजी आमदार जगताप यांनी पाण्यापाासून वंचित असलेल्या ६५ गावांसाठी मंजूर करण्यात आलेली सुधारित म्हैसाळ योजनाही गतीने पूर्ण करून वंचित लोकांना न्याय देण्याची आमची सर्वांचीच भूमिका असल्याचे सांगितले.