ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज माध्यमांशी बोलत असतात. त्यांनी आज एकनाथ शिंदे, भाजपा, राहुल नार्वेकर यांच्यावर कडाडून टीका केली. तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख शूपर्णखा असा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बऱ्याचदा त्यांच्या टीकेला काहीही उत्तर देत नाहीत. मात्र आज कराडच्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“कराडच्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आला आहे. इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे. सर्वात छोटी गायही आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या कृषी प्रदर्शनात अनेक गोष्टी पाहण्यास मिळत आहेत. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल तर सांगा. ते रेडे इतके टीव्हीवर बोलतात की त्यावर उपायाचं काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात लगावला आहे.

कराडच्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग

आज कराडमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते. या दोघांनीही भाषणं केली. आपल्या भाषणादरम्यान शेती विषयक कामांचं देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकही केलं. “कृषी आणि उद्योग जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होतो.” असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधल्या कार्यक्रमात केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज या कृषी महोत्सवात मी आलो याचा मला आनंद होतो आहे. आपल्या देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते असं मला वाटतं. कारण शेतकऱ्यांनी मातीत प्रयोग केले आणि सोनं पिकवलं. आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेलं. अन्न, वस्त्र मिळतील ही व्यवस्था शेतकऱ्यांनी उभी केली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.