महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा २७ जानेवारीला पार पडणार आहे. या दोघांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ ला पार पडला होता. आता राज यांची होणारी सून मिताली बोरुडे नेमकी आहे तरी कोण याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाचं आमंत्रण देण्यास सुरुवात केली असून रतन टाटा यांनी पहिलं आमंत्रण देण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत रतन टाटा यांची भेट घेत त्यांना अमितच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. हा लग्नसोहळा आपण अतिशय आटोपशीर पद्धतीनं करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. पाहूयाच मिताली हिच्याविषयीच्या काही गोष्टी…

१. मिताली ही मूळची मुंबईचीच असून ती पेशाने फॅशन डिझायनर आहे. लठ्ठपणातज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.

२. उर्वशी ठाकरे या राज ठाकरेंच्या मुलीची मिताली अतिशय जवळची मैत्रीण आहे. या दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा फॅशन ब्रँड तयार केला होता.

३. अमित आणि मिताली मागील ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

४. ठाकरे कुटुंबियांसोबत मिताली युरोप टूरमध्येही गेल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

५. मितालीने आपले १२ ची परीक्षा रुईया महाविद्यालयातून दिली असून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.