नगर : नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अफगाणिस्तानातील मुस्लीम धर्मगुरूची हत्या करणाऱ्या संशयित मारेकऱ्यासह त्याचे दोन साथीदार अशा तिघांच्या राहुरी पोलिसांनी झडप घालून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टय़ासह पाच जिवंत काडतुसेसी हस्तगत करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (२७, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (२६, रा. चवडी जळगाव, मालेगाव, नाशिक), विशाल सदानंद पिंगळे (२३, रा. कोपरगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील संतोष ब्राह्मणे हा अफगाणी सुफी प्रचारक, सुफी ख्वाजा सय्यद झरीफ चिस्ती (३८) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी आहे. सुफी प्रचारक झरीफ चिस्ती मूळचे अफगाणिस्तानातील परंतु येवला नाशिक येथे स्थायिक झाले होते. गेल्या ५ जुलैला येवला एमआयडीसीमध्ये त्यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. सूफी प्रचारक झरीफ चिस्ती हे झरीफ बाबा या नावानेही ओळखले जात. त्यांचे मोठय़ा संख्येने अनुयायी होते. या गुन्ह्याचा तपास नाशिक गुन्हे शाखा करत आहेत. गुन्हे शाखेने प्रसारित केलेल्या मारेकऱ्यांच्या छायाचित्रानुसार संतोष ब्राह्मणे हा संशयित मारेकरी असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three including suspect killer arrested in afghan sufi preacher murder case zws
First published on: 05-08-2022 at 03:37 IST