मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ झालेल्या अपघातात तीन ठार तर दोन जण जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यात गाडीतील अंजू पटेल (३२), दिना सिंग (४३) या दोन महिला आणि पूर्व पटेल हे तीन महिन्याचे बाळ हे तिघेही जागीच ठार झाले, तर प्रणव पटेल व मनीष जयंतीलाल (वय ३२) हे दोघे गंभीर जखमी झाले. सर्व जण गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहे. महाराष्ट्र पर्यटनासाठी आलेले हे कुटुंब पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
द्रुतगती मार्गावर अपघातात तीन ठार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ झालेल्या अपघातात तीन ठार तर दोन जण जण जखमी झाले.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 21-12-2015 at 00:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in accident on expressway