सोलापूर : तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिक येथून तुळजापूरकडे निघालेल्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर तामलवाडीजवळ तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर हा अपघात झाला.

निखील रामदास सानप (वय २१), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२) आणि अथर्व शशिकांत खैरनार (वय २२, तिघे रा. चास, ता.सिन्नर, जि. नाशिक) अशी या अपघातातील दुर्दैवी मृतांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बीडकर (वय २२) आणि दीपक बीडकर (वय २६, सर्व रा. चास, ता. सिन्नर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – सांगली : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असा संदेश देत तरुणाची आत्महत्या

हेही वाचा – VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सर्वजण एकाच गावातील राहणारे तरुण देवदर्शनासाठी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट येथे जाण्याकरिता बोलेरे गाडीतून (एमएच १५ ईएक्स ३२११) प्रवास करीत होते. सकाळी सोलापुरातून तुळजापूरकडे त्यांची बोलेरे गाडी निघाली. तुळजापूर तालुक्याच्या सिमेवर तामलवाडीजवळ बोलेरे गाडीचे टायर फुटले आणि गाडी पालथी झाली. या अपघातात तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींच्या मदतीसाठी तामलवाडी पोलिसांसह स्थानिक तरुणांनी धाव घेतली.