वीज बिलाचा बोजा कमी करण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँक गुंतवणूक करणार आहे अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी मंगळवारी दिली.

हेही वाचा- धनुष्यबाण नक्की कुणाचा? ठाकरे-शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारी; दोन्हीकडून जोरदार युक्तीवाद

खासदार पाटील यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन दौर्‍यावेळी त्रिपक्षिय करार केला होता. केंद्र सरकारने कर्ज हमी देण्यास मंजुरी दिली आहे. . या प्रकल्पाला कार्यान्वीत करणेसाठी महाराष्ट्र शासनाने १८ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विशेष प्रोत्साहन व मान्यता दिली.

हेही वाचा- जालना : दर्शनावरून परतणारे दोघे अपघातात ठार

मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेसमवेत करारनामा करणेसाठी जर्मन बँकेच्यावतीने संचालक श्रीमती कुरोलीन गेसनर व श्रीमती यलॉडिया स्केमलर आणि राज्य शासनाच्यावतीने वित्त विभागाचे उपसचिव श्री. वाघ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले यांनी स्वाक्षर्‍या करुन करारनामा केला.

हेही वाचा- “बारामतीत चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात” म्हणणाऱ्या पडळकरांवर अजित पवार संतापले; म्हणाले, “तो काय…”

या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी २०० मेगावॅट सौर उर्जा ही उपसा सिंचन योजनेसाठी वापरली जाणार आहे. त्याकरिता रु. १४४० कोटी इतका खर्च येईल. या प्रकल्पाकरिता जत तालुययातील संख येथील सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे. जर्मन बँकेकडे टेंभू उपसा सिंचन योजना (विस्तारीतसह) व जत विस्तारीत म्हैसाळ योजना या प्रकल्पांकरीताही ३०० मेगाव्हॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करणेची मागणी करण्यात आली असून सदर मागणीला जर्मन बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.