महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधाल लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. याबाबत त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.

अविनाश जाधव यांनी ५ कोटींचं खंडणी मागितल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले, “मी परवा हुतात्मा चौकात होतो. तेव्हा वैभव नावाच्या मुलाचा फोन आला. मी आणि वरिष्ठ अधिकारी तिथे गेलो. खरंच खालून लॉक केला होता. आम्ही वर गेल्यानंतर मालक वाईट भाषेत बोलायला लागला. तिथे माझा आणि त्यांच्यात थोडासा वाद झाला. हे एवढंच प्रकरण आहे.

हेही वाचा >> मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात सराफाची तक्रार, पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

“माझ्याबरोबर वरिष्ठ पोलीस वगैरे होते. त्यांच्यासमोर मी खंडणी मागेन का? पोलीसच एफआयरमध्ये म्हणत आहेत की पोलिसांसमोर अविनाश जाधवने मारहाण केली, पोलिसांसमोर कोणी खंडणी मागतं का? या गुन्ह्याप्रकरणी आम्ही हायकोर्टात गेलो आहोत, आम्हाला स्टेसुद्धा मिळेल. हा फक्त बदनामीसाठी दाखल केलेला गुन्हा आहे. माझा याच्याशी काही संबंध नाही. फक्त कोणाला तरी वाचवायला गेलो. त्यानंतर एका अब्जाधिश गोल्डमाफियाला मदत करण्यात आलेली आहे. राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बदनामीचा कट आहे”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> अमित शाहांचा कोकणातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एफआयरमध्ये काय नोंदवलं?

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.