Coronavirus : राज्यात दिवसभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ८५ नवे करोनाबाधित

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर

corona patients in Maharashtra
राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात राज्यभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ८ हजार ८५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, २३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज करोनाबाधित व करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येतील फरक हा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,०९,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१७,०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘डेल्टा प्लस’बाबत या क्षणाला अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे

तर, करोना पाठोपाठ आता डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं टोपे म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Today 8623 patients in the state recovered from corona the recovery rate is 96 percent msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या