लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पक्ष कोणा एकाच्या मालकीचा नाही, तर जनतेचा आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रांच्या आधारे शिक्कामोर्तब केले असून आजचा निकाल हा श्रीरामाचाच आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी बुधवारी निकालानंतर दिली.

Sanjay Raut, Narendra Modi, Jalgaon,
नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमदार बाबर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा विचार आणि विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून आमची वाटचाल सुरूच राहील. मागील अडीच वर्षात करोना संकटाचे कारण पुढे करून घरी बसून राज्य चालविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आताही सरकारपुढे संकटे आली, मात्र न डगमगता सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहेच.

आणखी वाचा-“घराणेशाही मोडीत निघाली”, आमदार अपात्रताप्रकरणी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

आमचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल याअगोदरच निवडणूक आयोगाने दिला आहे. आता यावर विधानसभा अध्यक्षांनी मोहोर उमटवली आहे. आम्ही बाजूला झालो ते केवळ पक्षावर जनतेने व्यक्त केलेला विश्‍वास अधिक दृढ करण्यासाठीच. यामुळे त्याला बंड म्हणता येणार नाही. पक्ष हा कोणा एकाच्या मालकीचा कधीच होउ शकत नाही. तर जनता हे ठरवत असते.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधात निकाल दिला तर न्यायालयात जाण्याचे इशारे देण्यात आले. मात्र, आता आम्ही या सर्वाना सामोरे जाण्यास तयार आहे. आमची बाजू सत्याची, जनतेची आहे, त्यामुळे आजच्या निकालाचा कोणताही ताण अथवा तणाव आमच्यावर नव्हता. राज्याचा विकास झाला पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळायला हवा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेउनच आमची पुढची वाटचाल राहील.

आणखी वाचा-उद्धव ठाकरेंची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया, “राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश…”

निकाल जाहीर होण्यापुर्वी काही मंडळी आम्ही जनतेच्या दारात जाऊ असे सांगत होते. आता त्यांनी जनतेच्या दारातच न्यायासाठी जावे. आमची त्याला तयारी आहे. जनता जनार्दनच अखेर कोण सत्य कोण असत्य हे सांगेल असेही आमदार बाबर यावेळी म्हणाले.

निकालानंतर जल्लोष

आमदार अपात्र निकालाचे शिंदे गट आमदार अनिल बाबर यांच्याकडून जल्लोषात स्वागत करण्यात आला आहे. सांगलीच्या करगणी येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे.खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर हे देखील या जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी शिंदे गट शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा स्वागत केले आहे. अपात्र आमदाराच्या यादीत अनिल बाबर यांचे देखील नाव होते.