प्रेमप्रकरणातून गरोदर राहिलेल्या तरुणीचा आधी गर्भपात केला. नंतरही विवाहासाठी पिच्छा पुरवू नये या हेतूने तिला विषारी गोळय़ा बळजबरीने खाऊ घालून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी शहराच्या नालेगाव भागात ही घटना घडली. स्नेहाधार संस्थेच्या मदतीने संबंधित तरुणीने गुन्हा दाखल केला, मात्र पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.
अभिनंदन वाळके (रा. कोर्ट गल्ली, नगर) व त्याचा नातेवाईक असलेला देवेंद्र रभाजी वाळके (रा. कवडेवाडा, नालेगाव, नगर) या दोघांविरुद्ध भादंवि ३०७, ३७६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार व फसवणूक झालेल्या शहरातीलच एका २४ वर्षीय तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
अभिनंदन वाळके याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे अत्याचार केले. त्यातून ती गरोदर राहिली. त्यानंतर तिला अभिनंदनने कसल्या तरी गोळय़ा खाऊ घालून तिचा गर्भपात केला. तरुणी त्याच्या घरी गेल्यावर वाळकेच्या नातेवाइकांनी मध्यस्थी करत अभिनंदनशी एक महिन्यात विवाह लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अभिनंदन चार महिने टाळाटाळ करत होता. सोमवारी (दि. १३) ती पुन्हा त्याच्या घरी नालेगावात गेली असता, तेथे तिला मारहाण करण्यात आली व देवेंद्र वाळके याने तिला बळजबरीने विषारी गोळय़ा खाऊ घातल्या.
तशाच अवस्थेत ती तरुणी स्नेहाधार संस्थेच्या कार्यालयात गेली. तेथील कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2015 रोजी प्रकाशित
तरुणीचा गर्भपात करून खुनाचा प्रयत्न
प्रेमप्रकरणातून गरोदर राहिलेल्या तरुणीचा आधी गर्भपात केला. नंतरही विवाहासाठी पिच्छा पुरवू नये या हेतूने तिला विषारी गोळय़ा बळजबरीने खाऊ घालून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 17-04-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trying to murder after abortion of girl