सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकात आगमन करणारी तुतारी एक्सप्रेस आज (९ फेब्रुवारी) प्रवाशांसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक घेऊन दाखल झाली. २ वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती ‘तुतारी’च्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

गेल्या २ वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रेल्वेच्या डब्यांचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. कोल्हापूर-गोंदिया या सारख्या लांब पल्ल्यांच्या ५ एक्सप्रेस गाड्यांद्वारे ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.

“१ फेब्रुवारी ते १ मार्च या महिन्याभरात उपक्रम राबवणार”

यामध्ये आरोग्यास कोरोना काळात देण्यात आलेले प्राधान्य, शेती, क्रीडा, सामाजिक या क्षेत्राबरोबरच कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग विमानतळ, उद्योग, पर्यटन, सागर संपत्ती, चक्रीवादाळ बाधित मच्छिमारांना २८ कोटी रुपयांची मदत, चक्रीवादळ बाधित फळबागांसाठी पुनःलागवड व पुनःरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात यासह वेगवेगळ्या आघाडीवर झालेली प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते १ मार्च या महिन्याभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : लोकांनी आयुष्यभर ‘बुस्टर डोस’ घेत रहायचं का? काँग्रसच्या ‘या’ खासदाराचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

याआधी बेस्ट बस, एसटीवर अशा जाहिराती आलेल्या आहेत. लोकल ट्रेनवर पण राज्य सरकारचे कार्यक्रम आणि इतर जाहिरती लावल्या गेल्या आहेत, पण लांब पल्ल्याच्या ट्रेनवर बहुदा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहिरात होत आहे.