Twitter Files Explained in Marathi: ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ‘ट्विटर फाइल्स’बाबत खुलासा केला आहे. त्यांनी एक ट्विटर थ्रेड रिट्विट केला आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ची एक बातमी दडपण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केला होता, याचा खुलासा त्यामध्ये करण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियावर ‘ट्विटर फाइल्स’ हा चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय आहे?

लेखक आणि ट्विटर वापरकर्ता मॅट तैब्बी (Matt Taibbi) यांनी केलेल्या ट्विटनुसार, २०२० मध्ये ट्विटर कंपनीने बायडेन टीमने विनंती केल्यानंतर ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या एका बातमीवर कारवाई केली होती. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टने ‘BIDEN SECRET EMAILS’ बाबत एक लेख प्रसिद्ध केला होता. पण बायडेन टीमच्या विनंतीनंतर ट्विटरने ही बातमी सेन्सॉर केली होती.

हेही वाचा- विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेचे भवितव्य काय? सत्ताधाऱ्याविरुद्ध विरोधकांची तक्रार काय?

तैब्बी यांच्या मते, न्यूयॉर्क पोस्ट वृत्तपत्राची ‘हंटर बायडेन लॅपटॉप स्टोरी’ दडपण्यासाठी ट्विटरने विलक्षण पावलं उचलली होती. ट्विटरने संबंधित बातमीची लिंक आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली होती. तसेच ती बातमी असुरक्षित असल्याचा इशाराही पोस्ट केला होता. याशिवाय त्यांनी ‘डायरेक्ट मेसेज’द्वारे (DM) बातमी शेअर करण्यावरही प्रतिंबध लावले होते. विशेष म्हणजे अशा प्रकारची कारवाई केवळ ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’सारख्या एखाद्या गंभीर प्रकरणांमध्ये केली जाते. पण या प्रकरणामध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीसाठी ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा- विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

तैब्बी यांनी आपल्या ट्विटमध्ये असाही दावा केला की, न्यूयॉर्क टाइम्सची बातमी दडपण्याचा निर्णय ट्विटर कंपनीतील उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी घेतला होता. परंतु ट्विटरचे तत्कालीन मालक आणि सीईओ जॅक डोर्सी यांना याबाबत काहीही माहिती नव्हती. लीगल, पॉलिसी अँड ट्रस्टच्या माजी प्रमुख विजया गड्डे यांचा यामध्ये मुख्य सहभाग होता, असंही तैब्बी यांनी सांगितलं.

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीत काय होतं?

२०२० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, १४ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्क पोस्टने हंटर बायडेन यांच्या ईमेलचा संदर्भ देत एक लेख प्रकाशित केला होता. ज्यामध्ये हंटर बायडेन यांनी आपले वडील आणि तत्कालीन अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बायडेन यांची युक्रेनमधील ऊर्जा कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याशी भेट घडवून आणली होती. ही भेट युक्रेनमधील हंटर बायडेन यांच्या व्यवसायाबद्दल होती.

हेही वाचा- विश्लेषण : ‘Dark Web’ इंटरनेटचे काळे जग ; जिथे लोकांच्या वैयक्तिक माहितीची होते विक्री आणि सुरू असतात ‘अवैध धंदे’

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, १७ एप्रिल २०१५ रोजी हंटर बायडेन यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये, बुरिस्मा (Burisma) कंपनीच्या बोर्डाचे सल्लागार Vadym Pozharskyi यांनी लिहिलं की, “प्रिय हंटर, मला वॉशिंग्टन डीसी येथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला तुझ्या वडिलांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत वेळ घालवला, हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे.”

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीवर ट्विटरने काय कारवाई केली?

ट्विटरने या बातमीला ‘हॅक केलेले साहित्य’ या धोरणाचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. त्यामुळे हा लेख सेन्सॉर करण्यात आला. २ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या एका लेखात न्यूयॉर्क पोस्टने म्हटलं की, ‘हॅक केलेले साहित्य’ या धोरणाचं उल्लंघन केल्याचा ट्विटरचा दावा निराधार होता. या कारणास्तव ट्विटरने न्यूयॉर्क पोस्टचं ट्विटर खातं दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित केलं होतं.

‘एनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्पचे तत्कालीन खासगी वकील Rudy Giuliani यांनी हंटर बायडेन यांचे ईमेल न्यूयॉर्क पोस्टला दिले होते. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, त्यांनी डेलावेअर कॉम्प्युटर स्टोअरला दिलेल्या लॅपटॉपमधून या फाइल्स मिळवल्या आहेत.

जॅक डोर्सी यांची भूमिका काय होती?

ट्विटर आणि न्यूयॉर्क पोस्ट यांच्यातील वादानंतर, तत्कालीन ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटलं की, कारण स्पष्ट न करता एखाद्या वापरकर्त्याला पोस्ट शेअर करण्यापासून रोखणे हे कंपनीसाठी अस्वीकार्य आहे.

हेही वाचा- विश्लेषण: हॅकर्स तुमच्या ब्लूटूथ उपकरणांद्वारे डेटा कसा चोरतात? ‘ब्लूबगिंग’ हॅकिंग तंत्र नेमकं आहे तरी काय?

डोर्सी यांनी १५ ऑक्टोबर २०२० रोजी एका ट्विटमध्ये म्हटलं की, “न्यूयॉर्क पोस्टवर केलेल्या कारवाईबाबत आमचा संवाद स्पष्ट नव्हता. कोणतंही स्पष्ट कारण न देता ट्वीट किंवा डायरेक्ट मेसेजद्वारे URL शेअर करण्यावर प्रतिबंध लावणे, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्विटरवर आरोप केल्यानंतर जॅक डोर्सी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter files elon musk tweet about hunter joe biden secret emails rmm
First published on: 05-12-2022 at 16:47 IST